Canada Accuses India’s Interference : कॅनडाच्या निवडणुकांत भारताने हस्तक्षेप केल्याचा कॅनडाचा फुकाचा आरोप !
कॅनडाचा सरकारी आयोग चौकशी करणार
ओटावा (कॅनडा) – भारतावर खलिस्तानी आतंकवादी निज्जर याची हत्या करण्याचे बिनबुडाचे आरोप करणार्या कॅनडाकडे त्याविषयीचे पुरावे मागितले असता अजूनही तो कोणताच पुरावा देऊ शकलेला नाही. अशातच त्याच्या ‘फॉरीन इंटरफेरन्स कमिशन’ने भारतावर गंभीर आरोप केला आहे. ‘भारताने तेथील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केला’, असे या आयोगाचे म्हणणे आहे. याची चौकशीही हा आयोग करणार आहे, असे त्याने म्हटले आहे.
Canada accuses India of an alleged 'interference' in its general elections.
A Canadian government committee is formed to investigate further into the matter.
👉 Firstly, even if India had interfered, Canada would never have been able to understand it. Nevertheless,… pic.twitter.com/fwGwyuBjfh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 25, 2024
याआधीही कॅनडाने वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये चीन त्याच्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. भारतावरील आरोपांची चौकशी करून कॅनडाचा आयोग ३ मे २०२४ पर्यंत अंतरिम अहवाल पूर्ण करणार आहे, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम अहवाल सादर करणार आहे. हा आयोग रशिया आणि इराण यांच्या कथित सहभागाचीही चौकशी करत आहे.
संपादकीय भूमिका
|