मौजे वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ९ वीतील अल्पवयीन धर्मांध विद्यार्थ्याने शाळेत टिपू सुलतानचे चित्र लावले !
कारवाईसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !
कोल्हापूर – मौजे वडगाव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये शाळेत वर्ग सजावट चालू आहे. याच शाळेतील इयत्ता ९ वीत शिकणार्या एका अल्पवयीन मुसलमान विद्यार्थ्याने शाळेतील भिंतीवर विविध महापुरुषांच्या चित्राशेजारी टिपू सुलतानचे चित्र लावले. हा विषय गावातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी शाळा प्रशासनास याचा जाब विचारला. यानंतर टिपू सुलतानचे चित्र काढून टाकण्यात आले; मात्र संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यास तांत्रिक अडचण सांगत प्रशासनाने टाळाटाळ केली. याप्रसंगी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेरीस शाळा प्रशासनाने कारवाई करण्याचे मान्य करत ‘संबंधित विद्यार्थ्यास शाळेतून काढून टाकून त्याचा दाखला पोस्टाने पाठवून देऊ’, असे आश्वासन दिले.
सौजन्य एस् न्यूज कोल्हापूर
यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे धर्मांध मुसलमान विद्यार्थ्याने चित्र लावल्यावर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांपैकी कुणीही आक्षेप घेतला नव्हता. (हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारा, हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करणारा आणि सहस्रो हिंदूंची हत्या करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे चित्र लावणे, हे शिक्षक, मुख्याध्यापक यांना चुकीने न वाटणे हे लज्जास्पद होय ! – संपादक)
या वर्गात अन्य अनेक वर्गांतील विद्यार्थी आल्यावर त्यांना हा विषय समजला आणि नंतर हा विषय गावात पोचला आणि पुढील कृती झाली. या घटनेमुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून सातत्याने प्रत्येक मासात कोणत्या ना कोणत्या गावात टिपू सुलतानचे चित्र ‘स्टेटस’वर अथवा ‘डीपी’ ठेवणे, प्रत्यक्ष चित्र लावणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आता पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.
संपादकीय भूमिकावारंवार घडणार्या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा ! |