कल्याण येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर २ पोलीस निलंबित
ठाणे, २४ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येतील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी म्हणून येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही या भागात धर्मांधांकडून भगवे झेंडे आणि जय श्रीराम लिहिलेल्या गाड्यांवर आक्रमण झाले होते. नंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंद केले. या प्रकरणाला उत्तरदायी धरून वरिष्ठांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील २ पोलिसांना निलंबित केले आहे.
अयोध्येत श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चालू असतांना कल्याण येथे २० हिंदू दुचाकीने दुर्गाडी किल्ला भागातून गोविंदवाडी पूल भागातून जात होते. त्या वेळी या भागातून धर्मांधांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यावरून या भागात तणाव निर्माण झाला होता. येथे गाड्यांची हानी झाली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुसलमानांच्या धर्मस्थळाच्या व्यवस्थापकाने हिंदूंच्या विरोधात तक्रार दिल्यावर बाजारपेठ पोलीस ठाणे येथे हिंदूंच्या विरोधातच गुन्हा नोंद केला आहे. (धर्मांधांकडून आक्रमण झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची मागणी करण्यासाठी एकत्र झालेल्या हिंदूंवरच जर गुन्हे नोंद होत असतील, तर यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक)