विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणावर तोडगा निघेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड समिती काम करत आहे. १ लाख ४० सहस्र जणांचे पथक मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करत आहे. त्याचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर होईल. त्यानंतर ‘विशेष अधिवेशन’ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ जानेवारी या दिवशी येथे केले. ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ दरे या गावी पत्रकारांशी बोलत होते.