मिरज येथे धर्माभिमानी दिगंबर कोरे यांच्याकडून सनातनच्या रामलला विशेषांकाचे वितरण !
मिरज, २४ जानेवारी (वार्ता.) – येथील धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे यांनी अयोध्येच्या ‘श्रीराममंदिराच्या लोकार्पण’ सोहळ्याच्या निमित्ताने भोसले चौक येथे श्रीरामरक्षा सामूहिक पठणाचा कार्यक्रम २२ जानेवारी या दिवशी आयोजित केला होता. हा कार्यक्रम उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शेकडो रामभक्त युवक आणि युवती सहभागी झाले होते. या वेळी श्री. कोरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रामलला विशेषांकाच्या अनेक प्रती, सनातन-निर्मित श्रीरामरक्षास्तोत्र लघुग्रंथ, तसेच श्रीराम नामपट्टी यांचे वितरण करून धर्मप्रसार केला.