भारताच्या लोकशाहीतील संसदेत जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने असा प्रस्ताव सादर का करत नाहीत ?
‘जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये हा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावामध्ये म्हटले आहे की, हे सभागृह जानेवारी १९९० मध्ये जम्मू-काश्मीरमधील निष्पाप हिंदूंवर इस्लामी आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांनी केलेल्या आक्रमणाच्या निमित्ताने अतिशय दु:ख व्यक्त करते. तसेच हे सभागृह पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करते. हिंसाचारामुळे पलायन केलेल्या हिंदूंना अद्याप न्याय मिळालेला नसल्याने हा चिंतेचा विषय आहे.’