कोल्हापूर येथे १०८ फूट उंचीच्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण !
कोल्हापूर – सकल हिंदू समाजाच्या वतीने दसरा चौक येथे उभारण्यात आलेल्या १०८ फुटी श्रीरामाच्या भव्य प्रतिमेचे अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते २० जानेवारीला श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सर्वश्री आनंदराव पवळ, कैलास (आबा) जाधव, आशिष लोखंडे, शरद माळी, सुनील सामंत, गजानन तोडकर यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.