तारापूर (जिल्हा पालघर) येथे शिक्षकाच्या विरोधात विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
शिक्षकी पेशाला लाजवणारी घटना !
पालघर – २४ जानेवारीला, म्हणजे राष्ट्रीय बालिकादिनाच्या दिवशीच येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक शोषणाची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीला भ्रमणभाषमध्ये अश्लील छायाचित्र दाखवून शिक्षकाने तिच्यासमवेत अश्लील चाळे केल्याचा प्रकार तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.
संपादकीय भूमिकाविद्यार्थिनीशी गैरवर्तन करणारे शिक्षक हे नीतीमत्ता खालावल्याचे लक्षण आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने सर्वांना धर्मशिक्षण द्यावे ! |