आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद !
नवी मुंबई – सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा २६ जानेवारीला मुंबईत येणार असून २५ जानेवारीला कार्यकर्त्यांचा मुक्काम नवी मुंबईत आहे. त्यांची सोय कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील पाचही बाजारपेठांत दैनंदिन व्यवहार बंद असतील, असे परिपत्रक ए.पी.एम्.सी. प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे बाजार आवारात शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार होणार नाहीत.