समाजातील शांतता आणि आनंद यांना गालबोट लावणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा !  

सकल हिंदु समाजाच्या वतीने लांजा येथील तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन

तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

लांजा, २४ जानेवारी (वार्ता.) – नुकतीच अयोध्या येथे प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रीत्यर्थ्य देश-विदेशांत आनंदोत्सव साजरा करण्यात आला; परंतु महाराष्ट्रातील नाटे, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, पनवेल, कल्याण, नावेर, मीरा भाईंदर येथे काही समाजकंटकांनी भावना भडकवणारी कृत्ये केली. यामध्ये भावना भडकवणारे ‘स्टेटस’ ठेवले, झेंड्याची विटंबना केली, भावना भडकवणार्‍या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे शांततेत आणि आनंदात चालू असलेल्या सोहळ्याला गालबोट लावण्यात आले. अशा पद्धतीने सामाजिक सलोखा बिघडवणार्‍या समाज समाजकंटकांवर शासनाने कठोरातील कठोर कारवाई तातडीने करावी, अशी मागणीचे निवेदन येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. महाराष्ट्राचे माननीय गृहमंत्री यांना पाठवण्यात येणारे हे निवेदन तहसीलदार श्री. प्रमोद कदम यांनी स्वीकारले. निवेदन देण्यासाठी तालुक्यातील अनेक हिंदु धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.