(म्हणे) ‘मी रामभक्त नाही, तर राज्यघटना भक्त आहे !’
कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांचे विधान !
बेंगळुरू (कर्नाटक) – मी राज्यघटनेचा भक्त आहे. मला रामाविषयी भक्ती नाही. म्हणून मी श्रीराममंदिरात जात नाही. कुणी बोलावले, तर मंदिराचे वास्तूशिल्प पहायला अयोध्येला जाईन, असे विधान काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले. ते विधानसभेत बोलत होते. भाजप ३ कोटी लोकांना अयोध्येत घेऊन जात आहे. यावरून ते बोलत होते.
प्रियांक खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसने श्रीराममंदिराचा विरोध केलेला नाही. शंकराचार्यांनी विरोध केला. (कोणत्याही शंकराचार्यांनी श्रीराममंदिराचा विरोध केलेला नाही. असे असतांना खर्गे जाणीवपूर्वक खोटे बोलत आहेत ! – संपादक) श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा साधू-संतांनी केली पाहिजे. ‘अपूर्ण मंदिराचे उद्घाटन नको’, असे शंकराचार्य म्हणतात. त्याला काँग्रेसने उत्तर का द्यायचे ? सत्तेवर भाजपवाले आहेत ना ? मग त्यांनी उत्तर द्यावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार करावे, असे प्रमुखांनी सांगितले आहे. मी बुद्ध आणि बसवराज स्वामी यांच्या तत्त्वांचे पालन करतो.
संपादकीय भूमिका
|