रत्नागिरी जिल्ह्यातील संतप्त हिंदू पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर पोलिसांकडून धर्मांध आरोपींवर गुन्हे नोंद !
|
रत्नागिरी – श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वत्रचे हिंदू संतप्त झाले. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोली येथे तक्रारी नोंदवल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात ८ जणांना कह्यात घेतले आहे.
सौजन्य टाइम्स डिजिटल
रत्नागिरीत धर्मांध मुजावर पोलिसांच्या कह्यात
येथील धर्मांध सलमान मुजावर याने त्याच्या इन्स्टाग्रामवर बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून त्याखाली, ‘सबर… जब वक्त हमारा आयेगा, तब सर धडसे अलग किये जायेंगे’ (सबुरी बाळगा, जेव्हा आमचा वेळ येईल, त्या वेळी शिर धडापासून वेगळे केले जाईल) अशी पोस्ट केली होती. या आक्षेपार्ह लिखाणाची पोस्ट अनेक जणांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केली होती. यापूर्वीही सलमान मुजावर याने अशा अनेक पोस्ट प्रसारित केल्या होत्या. याविषयी हिंदुत्वनिष्ठ चंदकात श्रीधर राऊळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
राजापूर येथे ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद : एक अल्पवयीन मुलाला अटक
‘इन्स्टाग्राम’वर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याबद्दल साखरीनाटे येथील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. (अल्पवयीन मुलाला अटक करून त्याच्यावर कारवाई करता येणार का ? – संपादक) या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरिक्षक अविनाश केदारी यांनी दिली. या प्रकरणी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चिपळूण येथे हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट
चिपळूण येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. विनोद भुरण आणि मनसे तालुकाध्यक्ष श्री. अभिनव भुरण यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन आक्षेपार्ह लिखाणाविषयीचे सूत्र उपविभागीय पोलीस अधिकारी अन् पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रारंभी पोलीस तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यास टाळाटाळ करत होते; परंतु हे वृत्त अन्य हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर मोठ्या संख्येने ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहिले आणि संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याविषयी सांगण्यात आले. हिंदुत्वनिष्ठांनी दबाव निर्माण केल्यानंतर श्री. अभिनव भुरण यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यात आली. यानंतर पोलिसांनी मुबारक खेरडकर आणि फक्रुद्दीन निसार जुवेकर यांना चौकशीसाठी कह्यात घेतले आणि ७ जणांवर गुन्हा नोंदवला
दापोलीत हिंदूंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ४ धर्मांध कह्यात !
आक्षेपार्ह पोस्टवरून संतप्त नागरिकांनी केळसकर नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्र येत या घटनेचा निषेध केला. त्यानंतर नागरिकांनी केळसकर नाका ते पोलीस ठाणे असा मोर्चा काढला. या मोर्चाच्या वेळी आलेली पोलिसांची गाडी संतप्त जमावाने रोखून धरत ‘संबंधित धर्मांधांनी जनतेची माफी मागावी’, अशी मागणी केली. ‘धर्मांधांना आमच्या कह्यात द्या’, ‘आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे’, अशी मागणी करण्यात आली. दापोलीत वारंवार असे प्रकार घडत असतील, तर अशांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि यापुढे अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना काढावी’, अशी मागणी केली. ३ तास होऊनही हिंदू शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी ४ धर्मांधांना कह्यात घेतले. या चौघांनी सर्वांसमोर क्षमा मागितली. त्यांना ‘जय श्रीराम’, ‘शिवाजी महाराज की जय’ हे म्हणायला लावले त्यानंतर जमाव थोडा शांत झाला. त्यानंतर पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी संबंधित आरोपींवर कारवाई करत असल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
चिपळूण येथील धर्मांध आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी
आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून धमक्या देणार्या चिपळूण येथील धर्मांध ७ आरोपींपैकी आज मुबारक खेरडकर, फक्रुद्दीन जुवेकर आणि साकीब खान, वेहळे या ३ जणांना अटक करण्यात आली; मात्र त्यांना जामीन संमत होऊ नये यासाठी हिंदुत्वनिष्ठानी एकत्र येऊन पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. ‘धर्मांधाना वचक बसण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळालीच पाहिजे’, असा आग्रह धरण्यात आला. दुपारी आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना न्यायालयाकडून २४ आणि २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
अजूनही अन्य ४ आरोपींना अटक झालेली नाही. याविषयी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक पाचपुते हे तपास करीत आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नका ! – रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकरअशा आवाहनांना धर्मांध कधीही भीक घालत नाहीत. अशांचे पालन केवळ हिंदू करतात, हे लक्षात घ्या ! शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर म्हणाले की, एका इसमाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे दोन धर्मांत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरिकांना सांगणे आहे की, अशा पोस्ट सामाजिक माध्यमांवर प्रसारित करू नका जेणेकरून असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. अशा पोस्ट कुणी प्रसारित केल्या असतील, तर तुम्ही पोलिसांचे साहाय्य घ्यायचे आहे. स्वत: कायदा हातात घ्यायचा नाही. पोलिसांकडे योग्य ती तक्रार करायची आहे. पोलीस त्याविषयी जरुर दखल घेतील. |
संपादकीय भूमिकाधर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! |