विजयाखेरीज आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही ! – नेतान्याहू
इस्रायल-हमास संघर्ष
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला १०९ दिवस झाले असून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युद्ध थांबवायचे नाही. हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूत्रावर नेतान्याहू म्हणाले की, आमच्याकडे विजय सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही. याखेरीज आम्हाला दुसरी कोणती आशाही नाही. हे राक्षस (हमास) नक्कीच पराजित होतील.
नेतान्याहू यांनी इस्रायली सैन्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत हे स्पष्ट केले की, युद्धाचे विश्लेषण करणार्या लोकांच्या मतांचा आमच्यावर विशेष परिणाम होणार नाही.