MP Muslim Women Became Hindu : भगवान श्रीराम स्वप्नात आल्याने मुसलमान महिलेने स्वीकारला हिंदु धर्म !
जबलपूर (मध्यप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या दिवशी उत्तरप्रदेशात एका मुसलमान कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलाचे नाव राम रहिम ठेवण्यात आले आहे. तसेच मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका मुसलमान महिलेने विधीवत हिंदु धर्म स्वीकारला आहे. रजिया बी असे या महिलेचे नाव आहे. रझियाच्या म्हणण्यानुसार एका आठवड्यापूर्वी प्रभु श्रीराम तिच्या स्वप्नात आले होते. त्यामुळे तिने हिंदु धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुणाच्याही दबावाखेरीज घेतला असल्याचे तिने सांगितले आहे. हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर रझियाचे नाव ‘नंदिनी’ ठेवण्यात आले आहे. तिने धर्मांतर करून इतर धर्मांचा स्वीकार केलेल्या मूळच्या हिंदु बांधवांना पुन्हा हिंदु धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य : News18 Virals
इस्लाममध्ये महिलांवर अनेक बंधने !
नंदिनी म्हणाली की, इस्लाममध्ये महिलांवर अनेक बंधने आहेत. हिंदु धर्मात मात्र महिलांचा सन्मान केला जातो. यामुळे मी हिंदु होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबानेही मला हिंदु धर्म स्वीकारण्याची अनुमती दिली.
संपादकीय भूमिकाभारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि मुसलमानप्रेमी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या हिंदु नेत्यांच्या स्वप्नात मात्र टिपू सुलतान, औरंगजेब, अकबर, बाबर हेच येत असणार, असेच कुणालाही वाटेल ! |