Soldier Fires Colleagues : मणीपूरमध्ये आसाम रायफल्सच्या सैनिकाने ६ सहकार्यांवर गोळीबार करून केली आत्महत्या !
इफांळ (मणीपूर) – चंदेल जिल्ह्यातील साजिक टॅम्पक येथे आसाम रायफल्सच्या एका सैनिकाने त्याच्या ६ सहकार्यांवर गोळीबार केला आणि नंतर स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. हे सर्व सैनिक म्यानमार सीमेवर तैनात होते. या सर्व घायाळ सैनिकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली, ते अद्याप समजू शकले नाही. आसाम रायफलच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, हे सर्व सैनिक मणीपूरच्या बाहेरील आहेत. या घटनेशी मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराशी कोणताही संबंध नाही.
सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स