Srilanka Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमारांना अटक
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने ६ मासेमारांना अटक केली आहे. त्यांच्या २ नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. हे मासेमार श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी करत होते, असा आरोप श्रीलंकेच्या नौदलाने केला आहे. मागील आठवड्यात १८ मासेमार्यांना अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकागेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! |