कल्याण येथे श्रीरामाच्या गाण्यात पालट करणार्या धर्मांधाविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे, २३ जानेवारी (वार्ता.) – कल्याण येथील बारावे गावातील एका धर्मांधाने प्रभु श्रीरामावर सिद्ध केलेल्या गाण्यात हिंदूंच्या भावना दुखावतील असे शब्द घालून त्यात पालट केला आणि ते गाणे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. या प्रकरणी बारावे गावातील रहिवासी श्याम मिरकुटे यांनी खडकपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. (असे कर्तव्यदक्ष नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत ! – संपादक) तक्रार प्रविष्ट होताच खडकपाडा पोलिसांनी शाहनवाझ महंमद शब्बीर शेख उपाख्य शानू शेख (वय ३१ वर्षे) या तरुणाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर ते थेट कायदा हातात घेतात, तर हिंदु वैध मार्गाने कारवाई होण्यासाठी प्रयत्न करतात, तरीही हिंदूंना असहिष्णु ठरवण्यासाठी पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष, काही प्रसारमाध्यमे प्रयत्न करत असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)