पुणे येथे धर्मांधाकडून कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न !
नर्हे (जिल्हा पुणे) – २३ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खेडेकर कॉर्नर येथील अनिल हलाल चिकनच्या दुकानातील धर्मांधाने अचानक रस्त्यावर येऊन ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत लोकांवर कोयता फेकून मारायला धावला. रस्त्यावरून येणार्या जाणार्या ३-४ लोकांवर त्याने कोयत्याने वार करून त्यांना इजा केली . ही जागा एका हिंदूची असून त्याने भाड्याने दिली आहे. घरमालक ‘हा बाहेरून आला आहे आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे’, असे म्हणत धर्मांधाची बाजू घेत होता. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती; पण धर्मांधाच्या हातात कोयता असल्याने त्याला रोखण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते. अखेर पोलिसांनी त्याला पकडले. सकल हिंदु आघाडीच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. (एका धर्मांधाच्या आक्रमकतेला विरोध न करणारे आणि बघ्याची भूमिका घेणारे हिंदू धर्मांधांच्या समुहाचा कधी सामना करू शकतील का ? – संपादक)