पुणे येथे लाच स्वीकारतांना अधिवक्त्यासह पोलीस उपनिरीक्षकास अटक !
आरोपीला अटक न करणे, अन्वेषणात साहाय्य करण्याचे आमीष !
पुणे – आरोपीला गुन्ह्यांमध्ये साहाय्य करण्यासाठी आरोपीच्या भावाकडून अधिवक्त्याच्या साहाय्याने ४० सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण आणि अधिवक्ता राहुल फुलसुंदर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी ३४ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती. (लाचखोरांना कठोर शिक्षा होत नाही; म्हणूनच अशी लाच घेण्याचे धाडस होते ! अशा लाचखोरांवर कठोर कारवाई बरोबर त्यांची संपत्ती जप्त केल्यास इतरांनाही त्याचा धाक बसेल ! – संपादक ) तक्रारदार याच्या भावाच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्याचे अन्वेषण चव्हाण करत होते. तक्रारदाराच्या भावाला अटक न करणे आणि गुन्ह्याच्या अन्वेषणामध्ये साहाय्य करण्यासाठी ५ लाख रुपयांची अधिवक्त्यांच्या वतीने मागणी केली होती. तडजोडीअंती ४० सहस्र रुपये स्वीकारतांना फुलसुंदर याला रंगेहात पकडले.
संपादकीय भूमिका :जनतेचे रक्षणकर्तेच भ्रष्टाचार करत असतील, तर कायद्याचे राज्य कसे येणार ? अशांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक ! |