Earthquake In China: चीनच्या शिनजियांगमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

नवी देहली – २२ जानेवारीच्या रात्री ११.३९ वाजता चीन-किर्गिस्तान सीमेवर ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून अनेक लोक घायाळ झाले आहेत. भूकंपानंतर ४० धक्केही नोंदवले गेले आहेत.

भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव उरुमकी, कोरला, काशगर आणि यिनिंग येथे जाणवला. चीनमधील भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. देहली-एन्.सी.आर्.मध्ये लोकांना भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले. घाबरलेले लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या भागात पोचले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजली गेली.