सुवर्णाक्षरात लिहिला जाईल अयोध्या येथील श्रीराममंदिरातील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा । श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पहाती तो याचि देही याचि डोळा ।।
लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्या लक्ष्मणपुरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचल्या असता उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी त्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी अयोध्येतील श्री कालेराम मंदिरात घेतले भावपूर्ण दर्शन !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्या येथे गेलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २१ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील श्री कालेराम मंदिरात जाऊन श्रीराम पंचायतनाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी तमिळनाडूतील श्री चिदंबरम् मंदिरातून दिलेले वाळ्याचे ३ हार श्रीरामाला अर्पण केले अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केली.
अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यापूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तमिळनाडूमधील श्री चिदंबरम् मंदिरातील श्री नटराजाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी तेथील पुजार्यांना त्या अयोध्या येथे श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार असल्याचे सांगितले. ते ऐकून तेथील पुजार्यांनी नटराजाच्या गळ्यातील वाळ्याचे ३ हार काढून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे सुपुर्द केले.
ShriSatshakti (Mrs) Binda Singbal and ShriChitshakti (Mrs) Anjali Gadgil presented garlands from Lord Nataraja of Chidambaram Nataraja Temple to Shri Kale Ram Temple, Ayodhya. 🛕
A beautiful exchange of Divine energy transcending distances. 🙏#RamMandirPranPrathistha… pic.twitter.com/qFxRpYlzqn
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 21, 2024
या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही अयोध्येला श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला जात आहात, तर त्याला हे ३ हार अर्पण करा. (या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पुजार्यांनी दिलेले ३ हार, म्हणजे सनातन संस्थेच्या ३ गुरूंचे आहेत, असे जाणवले. – संकलक) हे हार शिवाकडून (नटराज हे शिवाचे रूप आहे) श्रीरामाला भेट आहेत. तुम्हाला शिवाने माध्यम म्हणून निवडले आहे.’’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आणलेले ३ हार श्री कालेराम मंदिरातील पुजार्यांना दिले. या वेळी मंदिरातील पुजार्यांनी ‘हे तीनही हार चैतन्यमय असून ते उद्या (२२ जानेवारीला) श्रीरामाला अर्पण करतो’, असे सांगितले. या वेळी ते पुजारी म्हणाले, ‘‘राम हा शिवाचा आणि शिव रामाचा जप करतो.’’ श्री कालेराम मंदिर हे सम्राट विक्रमादित्य यांनी प्राचीन श्रीराममूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केलेले मंदिर आहे.