पश्चिम रेल्वेकडून अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण !

मुंबई – अयोध्या येथील सोहळा पहाण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्थानकांवर उपलब्ध असणार्‍या मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखवले. मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि ‘एल्.इ.डी. स्क्रीन’ उपलब्ध असलेल्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये हा सोहळा दाखवण्यात आला. यामध्ये रेल्वे स्थानकातील ४० आणि मुंबई लोकलमधील ९६० मोठ्या पडद्यांचा (‘स्क्रीन्स’चा) समावेश होता.