बगडीनगर (राजस्थान) येथील श्री सरियादेवी मंदिराची स्वच्छता आणि रामराज्यासाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ !

श्री सरियादेवी मंदिरात प्रतिज्ञा घेतांना धर्मप्रेमी पुरुष आणि महिला

बगडीनगर (जिल्हा पाली, राजस्थान) – अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निमित्ताने सध्या देशाच्या विविध भागात ‘श्रीरामनामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील श्री सरियादेवी मंदिराच्या प्रांगणाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी समितीच्या सौ. अर्चना लढ्ढा यांनी उपस्थितांकडून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, म्हणजे रामराज्यासाठी प्रतिज्ञा’ करून घेतली. या वेळी उपस्थितांकडून श्रीरामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. यानंतर धर्मप्रेमींनी आणलेल्या पणत्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आल्या. त्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला. या प्रसंगी उपस्थित भक्तांच्या घरी लावण्यासाठी ‘श्रीराम’ नामाच्या नामपट्ट्या देण्यात आल्या. या आयोजनासाठी कुसुमलता पंचारिया आणि जसोदा शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले.