वेळ मुहूर्ताची !
श्रीरामाचे मंदिर घडते
सर्वजण आम्ही त्याचे साक्षी ।
शतकांची ही उज्ज्वल गाथा
होईल आता त्याची परिपूर्ती ।।१।।
श्रीराम अवतरणार मंदिरी
विराजमान होतील हरएक हृदयी ।
देवावीण होते सूने-सूने ( व्यर्थ )
मांगल्याचे घडे बरसतील मनी ।।२।।
प्रक्रिया मंदिराची चालू जाहली
हृदयी जनांच्या निनादे तुतारी ।
देहमंदिराची वास्तू आमची
मूर्ती स्थापनेसाठी आतुरलेली ।।३।।
आक्रमकांनी कुकरम्यानी
वास्तू मंदिराची विध्वंसली ।
भारतियांच्या हृदयमंदिराची
देवावीन झाली भग्न स्थिती ।।४।।
वर्षे लोटली शतके सरली
लढता लढता भारतभूची शकले झाली ।
मंदिर घडूनी स्थापना होता श्रीरामाची
प्रक्रिया ‘अखंड भारतभू’ची आरंभली ।।५।।
ह्या क्षणाची आतूरतेने
प्रतीक्षा करत होती ही खंडित भूमी ।
पूर्तता ह्या कार्याची घडवेल
कोटी जनआकांक्षांची इतिश्री ।।६।।
साक्षी आपण सर्व जण कार्याचे
जीवनकाली आपुल्या मिळते संधी ।
चला जागवूया पुन्हा अल्पांशाने
रामराज्य स्थापनेची वेळ मुहूर्ताची ।।७।।
– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा.