Atal Setu : ‘अटल सेतू’वर पान किंवा गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणा आढळल्या !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटल सेतूवर तीनचाकी रिक्शांना अनुमती नसतांनाही त्या सेतूवरून धावत असल्याचा व्हिडिओ मध्यंतरी प्रसारित झाला. या पुलावर गाड्या बाजूला लावून काही जण तेथे छायाचित्रे काढतात. काही नागरिक तेथे कचरा टाकतात. काही ठिकाणी तर पान किंवा गुटखा खाऊन थुंकल्याच्या खुणाही दिसून आल्या आहेत.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारख्या घटना घडणे विश्वगुरुपदाकडे वाटचाल करणार्या भारतासाठी लज्जास्पद ! |
अटल सेतूवर पहिला अपघात !
या अटल सेतूवर नुकताच पहिला अपघात झाला आहे. अपघात झालेले वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात होते. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला त्याने धडक दिली.
#WATCH महाराष्ट्र: नवनिर्मित मुंबई ट्रांस हार्बर लिंक(अटल सेतु) पर एक कार अनियंत्रित होकर डिवाइडर से टकरा गई। (21.01)
(सोर्स: नवी मुंबई पुलिस) pic.twitter.com/ir46kDChiP
— ANI_HindiNews (@AHindinews) January 21, 2024
हे वाहन महिला चालवत होती. तिच्यासह एक पुरुष आणि लहान मूल होते. सुदैवाने या तिघांनाही अपघातात गंभीर दुखापत झालेली नाही. त्या तिघांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अपघात झालेली गाडी वेगमर्यादा पाळत होती का, हे अद्याप समजलेले नाही.