Mira Road Violence : मीरारोड (जिल्हा ठाणे) येथे श्रीराम शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !
|
(अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे)
मीरारोड (जिल्हा ठाणे) – श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पार्श्वभूमीवर २१ जानेवारीच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मुसलमानबहूल नयानगर भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या संख्येने अचानक आक्रमण केले. या आक्रमणाचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. विशेष म्हणजे धर्मांध मोठ्या संख्येने येऊन आक्रमण करत असतांना एकाही हिंदूने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एकही कृती केलेली दिसत नाही. धर्मांधांनी आक्रमण केलेल्या या भागाला ‘गाझा पट्टी’ असेही म्हणतात, असे समजते. (भारतात अशा नावांचे भाग निर्माण होईपर्यंत पोलीस प्रशासन काय करते ? – संपादक)
Attack on the Shriram Shobhayatra in Mira Road (Thane District), Maharashtra by fanatic Mu$lims.
👉 Hindus injured
👉 Chanting of ‘#AllahuAkbar‘
👉 Saffron flags snatched and tornIs Mira Road in India or #Pakistan, for such incidents to occur?
In a country with a Hindu… pic.twitter.com/sGqVtBVS5G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2024
व्हिडिओजमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांध दिसत असूनही पोलिसांनी केवळ ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. (पोलीस ‘देखल्या देवा दंडवत’ केल्याप्रमाणे हिंदूंना शांत करण्यासाठी केवळ ५ जणांवर गुन्हा नोंद करतात. महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठ शासन असतांना असे होणे दुर्दैवी आहे ! – संपादक)
१. धर्मांध तरुण मुले शोभायात्रेत अचानक घुसली आणि त्यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या हळू चालत असलेल्या चारचाकींच्या काचांवर लाथा, तसेच रॉड मारून त्या फोडल्या. तसेच वाहनांवर दगडफेकही केली. त्यामुळे गाडीत बसलेले, तसेच शोभायात्रेतील हिंदू घायाळ झाले. काही धर्मांधांनी चारचाकीचे दरवाजेही बळजोरीने उघडले. एक महिलाही घायाळ झाल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे.
२. धर्मांधांनी गाड्यांवरील भगवे ध्वज काढून टाकले, काहींनी ध्वज हिसकावले, तर काहींनी फाडले, तर काहींनी तर ते रस्त्यावर फेकून दिले.
३. धर्मांधांनी दुचाकीही फोडल्या.
४. वरील सर्व कृती करत असतांना धर्मांध ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा, तसेच शिव्या देत होते.
५. वरील घटनेनंतर परिसरातील तणाव वाढला. त्यानंतर तेथे पोलीस आले. पोलिसांनी अनेक जणांना कह्यात घेतले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
६. या मिरवणुकीत प्राधान्याने जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाचे लोक होते. धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.
संपादकीय भूमिका
(गंगा जमुनी तहजीब म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती.) |