कल्याण येथे तिघांनी महिलेचे २ लाखांहून अधिक रुपयांचे दागिने चोरले !
ठाणे, २१ जानेवारी (वार्ता.) – आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे सांगून एका ज्येष्ठ नागरिक महिलेची ३ भामट्यांनी फसवणूक केली. ही घटना कल्याण (पश्चिम) येथील खडकपाडा भागात घडली.
तक्रारदार महिला रस्त्यातून जातांना या तिघांनी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही तुम्हाला प्रभु श्रीरामाचे दर्शन घडवतो. तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अन्य सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा. तो चोरी होऊ नये; म्हणून आमच्याकडे द्या.’’ महिलेने २ लाख ६६ सहस्र रुपयांचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून त्या तिघांकडे दिला; पण हे भामटे महिलेला तेथेच सोडून पळून गेले. या प्रकरणी तिने तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिका :असुरक्षित कल्याण शहर ! |