पुणे येथील पोलीस कर्मचार्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !
पुणे – बारामतीत यापूर्वी कार्यरत असणार्या आणि सध्या पुणे मुख्यालयात कार्यरत असलेल्या दशरथ कोळेकर या पोलीस कर्मचार्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने पुण्यात तक्रार दिली आहे. ती बारामती शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली आहे. बारामतीत यापूर्वीही अन्य एका पोलीस कर्मचार्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना आहे.
कोळेकर यांनी तरुणीला साहाय्याच्या मोबदल्यात तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तिला मारहाण केली. तिच्या परिस्थितीचा अपलाभ घेत जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणी बारामतीतून पुणे येथे निघून गेली. तेव्हा कोळेकर याने तिच्या बहिणीला भ्रमणभाष आणि संदेश करत आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :असे वासनांध पोलीस असणे, हे पोलीस विभागाला लज्जास्पद ! महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील ! |