२२ जानेवारीला संगमनेर तालुक्यातील मद्य-मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !
अहिल्यानगर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !
संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – अयोध्या येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर आणि तालुका येथील मद्य-मांसविक्रीची दुकाने बंद ठेवावीत, या मागणीसाठी संबंधित अधिकार्यांना विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी प्रशांत बेल्हेकर, प्रखंड संयोजक कुलदीप ठाकूर, सिद्धेश पवार, प्रज्वल कोकणे आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.