छत्रपती संभाजीनगरातील सेक्स रॅकेट प्रकरणी कल्याणी देशपांडे हिला अटक !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील सेक्स रॅकेट प्रकरणी पुणे येथील कल्याणी उपाख्य जयश्री देशपांडे (वय ५५ वर्षे) या महिलेस गुन्हे शाखेने २० जानेवारी या दिवशी अटक केली. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तुषार राजपूत याने देहली येथील विदेशी मुली कल्याणी हिच्याद्वारे शहरात आणल्याचे अन्वेषणात पुढे येत आहे. उच्चभ्रू मंडळींना देश आणि विदेश येथील मुली पुरवण्यासाठी ‘दलाल’ म्हणून काम करणार्या कल्याणी देशपांडे यांच्या विरोधात पुणे येथील ५ पोलीस ठाण्यांत देहविक्रीचा व्यवसाय करण्यासह १० गुन्हे नोंद आहेत. (एका महिलेनेच मुलींना फसवून देहविक्रीत अडकवणे हे नैतिकतेचे झालेले अध:पतनच होय ! – संपादक)