मिरज येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या लोकार्पणाच्या निमित्त आज भव्य शोभायात्रा !
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !
मिरज, २१ जानेवारी (वार्ता.) – कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या संकल्पनेतून अयोध्या येथील प्रभु श्रीराममंदिराच्या प्रतिकृतीची उभारणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिकृतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम २२ जानेवारी या दिवशी शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात येथे २१ जानेवारी या दिवशी ‘भव्य शोभायात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. २२ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत गीतरामायण, श्रीराम कथापठण, प्रवचन, कीर्तन, भारूड, समूह नृत्य स्पर्धा, शालेय नाट्य स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन डॉ. सुरेश खाडे युवा मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.