कल्याण येथे दरोडा टाकणार्या ४ धर्मांधांना अटक, ३ जण पसार
ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – गुजरातहून कल्याण येथील बाजारात धान्य घेऊन येणार्या वाहनांवरील धान्य व्यापार्यांना लुटण्याच्या प्रयत्नांत असणार्या अरफात युसुफ शेख (वय २१ वर्षे), अजीम रौफ गाजी (वय २५ वर्षे), अरबाज इस्माईल शेख (वय २४ वर्षे) आणि अन्वर शौकत शहा (वय २५ वर्षे) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ चॉपर, सुरा, चाकू, मिरची स्प्रे, दोरी, भ्रमणभाषसंच, रिक्शा, तसेच रोख रक्क्म असा एकूण ७९ सहस्र ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ३ साथीदार पसार झाले आहेत. (लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)