आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकाने मागितली लाच !
लाच घेतांना मीरारोड येथे पोलीस हवालदार कह्यात
ठाणे, २० जानेवारी (वार्ता.) – गुन्ह्यातील आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली. त्यांतील १५ लाख रुपयांचा हप्ता घेतांना गणेश वनवे या पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मीरारोड येथे कह्यात घेतले आहे, तर पोलीस निरीक्षक शेलार पसार झाले आहेत. त्यांना वर्ष २०१५ मध्येही ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना सावंतवाडी येथे पकडण्यात आले होते. (अशा लाचखोरांना कठोर शिक्षा न झाल्यानेच त्यांचे लाच घेण्याचे धाडस होते ! – संपादक)