रामभक्तांनो, शरणागत आणि आर्त भाव वाढवून आपल्या हृदयमंदिरातही श्रीरामरायाची प्रतिष्ठापना करा !
‘प्रभु श्रीरामरायाचे तत्त्व आता अधिकाधिक कार्यरत झाले आहे. रामभक्तांनो, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीला रामभक्तीची जोड देऊन अंतःकरणात भक्तीचे दीप प्रज्वलित करूया. ‘शरणागत भक्ताचे हृदय’, हेच प्रभूचे खरे वास्तव्यस्थान आहे’, हे जाणून आपल्या हृदयमंदिरात श्रीरामभक्तीचे शिंपण करत श्रीरामाच्या आगमनाची भक्तीपूर्ण सिद्धता करूया. ‘राम’स्मरणाने अंतरदीपांमधील भक्तीज्योत अखंड प्रज्वलित ठेवून आणि ओंजळीत भावफुले घेऊन प्रभु श्रीरामाचे स्वागत करूया. आपल्या अंतर्मनातील लक्ष लक्ष भक्तीदीप उजळून त्या लक्ष ज्योतींच्या दिव्य प्रकाशात अंतस्थ प्रभु श्रीरामाचे मनोहारी रूप न्याहाळून राममय होऊया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२०.१.२०२४)