इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्‍या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो. आजचा काळ विपरीत आहे, नव्हे तर विलक्षण विरोधी आहे. आमची संस्कृती आणि आधुनिक पश्चिमी संस्कृती परस्परविरोधी आहेत. अशा अवस्थेत आमची अंतरीची संस्कृती या बाह्य परिस्थितीपासून आम्हाला अस्पर्श ठेवायची आहे आणि तिचा सतत विकास घडवून आणायचा आहे. बाह्य संस्कृतीला जरबेत ठेवून तिलाही आमच्या सेवेत राबवायचे आहे. हाच इतिहासाचा आदेश आहे.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२३)