२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !
सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांची मागणी
कारंजा (वाशीम), १९ जानेवारी (वार्ता.) – २२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संत गाडगेबाबा विचारमंच, सकल जैन समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्रीराम प्राणप्रतिष्ठा समिती, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, बागेश्वर धाम समिती या संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.