देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. राघव खिळे हा या पिढीतील एक आहे !
पौष शुक्ल दशमी (२०.१.२०२४) या दिवशी अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. राघव दत्तात्रय खिळे याला दुसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मी गरोदर असतांना मला पुष्कळ प्रसन्न वाटायचे. मला नामजप आणि सेवा करण्यात आनंद वाटायचा.
१ आ. तत्पर आणि उत्साही असणे : माझी कितीही धावपळ झाली, तरी मला आळस, तसेच थकवा नसायचा. गरोदरपणात महिलांना विश्रांती घ्यावीशी वाटते. मला तसे कधीच वाटले नाही. मी एकदम तत्पर आणि उत्साही असायचे.
१ इ. यजमानांनी नामजप केल्यावर पोटातील बाळाने हालचाल करून प्रतिसाद देणे : मी पोटातील बाळाशी बोलायचे. तेव्हा ते मला प्रतिसाद द्यायचे. माझ्या समवेत यजमान असले की, बाळ हालचाल करत नसे. तेव्हा मी यजमानांना सांगितले, ‘‘नामजप करा.’’ त्यांनी केवळ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असे म्हटले आणि त्यांना बाळाची हालचाल जाणवली. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद झाला. त्या दिवसापासून यजमान प्रतिदिन ५ मिनिटे तरी नामजप करू लागले.
२. जन्म ते ९ मास
अ. आम्ही नामजप केला की, तो हुंकार द्यायचा.
आ. एकदा त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवला. तेव्हा त्याने त्या ग्रंथावर डोके टेकवून नमस्कार केला. त्या वेळी मी त्याला विचारले, ‘‘राघव, काय करतोस ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘बंऽऽबंऽऽ’’ (म्हणजे बाप्पा !) त्या ग्रंथातील प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव यांच्या छायाचित्रांकडे पाहून त्याने न सांगता नमस्कार केला.
३. वय १० ते १२ मास
अ. त्याला मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यायला पुष्कळ आवडते. आम्ही देवदर्शनाला गेलो की, तो आनंदी असतो.
आ. त्याची मावशी सतत म्हणत असते, ‘‘राघव पुष्कळ आज्ञाधारक आहे. सांगितलेले सगळे ऐकतो.’’
इ. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा द्यायला फार आवडते. राघवला कुठेही त्यांचे लहानसे जरी छायाचित्र दिसले, तरी त्वरित तो ‘जय, जय’, असे म्हणतो.
४. वय १ ते २ वर्षे
अ. ‘आपण नामजपाला बसूया’, असे म्हटले की, तो बसायला आसन घालतो आणि २ मिनिटे का होईना, हातांच्या बोटांच्या मुद्रा करून त्याच्या भाषेत काहीतरी बोलतो. जेवायला बसतांना आम्ही स्तोत्र म्हटले की, तोही ते म्हणतो.
५. स्वभावदोष
राग येणे आणि चिडचिड करणे
‘श्रीकृष्णा, प.पू. गुरुमाऊली, ‘तुम्हीच राघवची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आणून दिली आणि लिहून घेतली’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अनुराधा दत्तात्रय खिळे (चि. राघवची आई), अहिल्यानगर (नोव्हेंबर २०२३)