रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका मार्गदर्शन करत असतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘जून २०२२ मध्ये झालेल्या शिबिरात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका मार्गदर्शन करत होते. तेव्हा ‘मला या दैवी शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली’, याबद्दल माझा कृतज्ञताभाव सतत जागृत होत होता आणि माझ्याकडून ‘शिबिराचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी प्रार्थना होत होती.
आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत) यांच्याबद्दलही मला कृतज्ञता वाटत होती.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या सत्संगाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘सर्व ठिकाणचे सर्व जीव हिंदु राष्ट्र-स्थापनेची शपथ घेत आहेत’, असा भावजागृतीचा प्रयोग आमच्याकडून करून घेतला. तेव्हा ‘प्रत्यक्षात तसे होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘हे धर्मकार्य सूक्ष्मातून गुरुदेवांनी पूर्ण केलेलेच आहे. मला केवळ सतत सकारात्मक राहून आणि कृतज्ञताभाव ठेवून प्रयत्न करायचे आहेत’, असे मला वाटत होते.
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या रथोत्सवाची सिद्धता करत असतांना आलेल्या अनुभूती सांगत होत्या. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच येत होते आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ करत असलेल्या वर्णनाप्रमाणे मला अनुभवता येत होते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या रथोत्सवाचे चलचित्र पहातांना भावजागृती होणे आणि ‘जीवन कृतकृत्य झाले’, असे वाटणे
त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ‘आता तुम्हाला रथोत्सवाचे चलचित्र (‘सीडी’) दाखवणार’, असे सांगितले. तेव्हा माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यानंतर रथोत्सवाचे चलचित्र पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी माझ्याकडून पुढील प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, तुमचे हे चरण सोडून मला कुठेही जायचे नाही. मला या चरणांमध्ये लवकर विलीन करून घ्या. माझे अस्तित्व नष्ट होऊ दे.’ चलचित्रातील गुरुमाऊलींचे ते नयनमनोहरी रूप पाहून माझे जीवन कृतकृत्य झाले.
‘गुरुदेवा, आता मला आणखी काही नको. ‘मला अखंड कृतज्ञताभावात रहाता येऊ दे आणि मला तुम्हाला अपेक्षित अशी सेवा अन् साधना करता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. पुष्पा चौगुले, देवद, पनवेल, रायगड. (२५.९.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |