हिंदूंनो, ज्याप्रमाणे मारुतिराया श्रीरामाचे रामराज्य साकार करण्यासाठी झटले, त्याप्रमाणे रामराज्यासम येणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी झटूया !

असा सुंदर संदेश प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक हेच पाठवू शकतात. संदेशाबद्दल दोघांच्या चरणी नमस्कार !

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. श्री रामलला श्रीराममंदिरात विराजमान झाल्यावर सर्व भक्तांचे दुःख हरण होणार ! 

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा आहे. प्रभु श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा त्रेतायुगानंतर थेट कलियुगात पहायला मिळणार, हे आपले भाग्य आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा योग आला आहे. त्रेतायुगात श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले. त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर रामराज्य आले होते. आताही श्रीराम अयोध्येत विराजमान होणार; म्हणजे रामराज्य येणार हे निश्चित ! ‘जेथे श्रीराम तेथे हनुमान’, यानुसार वायुमंडलात श्री हनुमान श्रीरामाच्या स्वागताची सिद्धता करत आहे. सर्व देवता पुष्पवृष्टीची सिद्धता करत आहेत. आता श्रीराममंदिर होणार असल्याने, तसेच श्रीराम जन्मस्थानी विराजमान होणार असल्याने सर्व भक्तांचे दुःख हरण होणार.

२. भारतासह संपूर्ण जगात रामराज्य येण्यासाठी हिंदूंनी खारीचा नव्हे, तर श्री हनुमानाचा वाटा उचलला पाहिजे !

या उत्सवासाठी भारतभरातील मंदिरांत नामजपाचे नियोजन, गावांतील मंदिरांची स्वच्छता आदी अनेक गोष्टी चालू आहेत. अयोध्येत जाता आले नाही, तरी आपल्या घरी, गावात, मंदिरात हा सोहळा आपण साजरा करू शकतो. हा मोठा उत्सवच असल्याने घरोघरी सजावट करूया. ज्याप्रमाणे मारुतिराया श्रीरामाचे रामराज्य साकार करण्यासाठी झटले, त्याप्रमाणे आपण रामराज्यासम येणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी झटूया. कलियुगाची भीषणता पहाता भारतासह संपूर्ण जगात रामराज्य (हिंदु राष्ट्र) येण्यासाठी आपण खारीचा नव्हे, तर श्री हनुमानाचा वाटा उचलला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण ध्येयाने वेडे होऊया. गुरूंना शरण जाऊन सर्वस्वाचा त्याग करून कार्य करूया.’

।। जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।।

–  श्रीरामसेवक प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, पानवळ, बांदा.