महाराष्ट्रातही २२ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी !
मुंबई – शासनाच्या वतीने महाराष्ट्रातही २२ जानेवारी या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. अयोध्येत होणार्या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रसरकारने केंद्रीय कर्मचार्यांना अर्ध्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदु जनजागृती समितीनेही या संदर्भात निवेदन दिले होते.