Ram Mandir Prasad : श्रीराममंदिराच्या सोहळ्याला उपस्थित निमंत्रितांना देण्यात येणार मंदिराच्या ठिकाणची माती, मिठाई आणि तुळशीचे पान !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील श्रीरामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी ८ ते १० सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सर्वांना त्या दिवशी प्रसाद म्हणून मंदिराची उभारणी करतेवेळी पाया खोदतांना जी माती काढली गेली ती प्रसाद म्हणून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून दिली जाणार आहे. यासह १०० ग्रॅमचा मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान एका खोक्यामध्ये दिले जाईल. तसेच शरयू नदीच्या पाण्याची बाटलीही दिली जाणार आहे. दुसरीकडे ‘गीताप्रेस’ या धार्मिक ग्रंथांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणार्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठवले आहेत. श्रीराममंदिरासाठी अनेकजण भेटवस्तू देत आहेत. श्रीरामासाठी धोती, पँट-शर्ट, तर सीतामातेसाठी बांगड्या, बिंदी, कानातले डुल भेट म्हणून दिले जात आहेत.