Kolar Sri Rama Banner : कोलार (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांनी फाडला श्रीराममंदिराचा फलक
दोघांना अटक
कोलार (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या २२ जानेवारीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी लावलेला श्रीरामाचा फ्लेक्स फलक अज्ञातांनी ब्लेडद्वारे फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुळबागीलू गावाच्या गुणीगंटिपाळ्य येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दोघांपैकी एकाचे नाव जहीर असल्याचे उघड झाले आहे. फलक फाडल्याच्या घटनेमुळे मुळबागीलू गावात तणावाचे वातावरणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|