Babbar Khalsa Terror Funding : ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून भारतात कोट्यवधी रुपये पाठवले !
|
नवी देहली – भारताविरुद्ध कॅनडा आणि पाकिस्तान येथून काम करणारी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने भारतात कोट्यवधी रुपये पाठवण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. यासाठी पारंपरिक ‘हवाला’ऐवजी भारत सरकारच्या विदेशी पर्यटकांसाठीची ‘एम्.टी.एस्.एस्.’ या योजनेचा अपलाभ उठवण्यात आला.
सौजन्य : कॅपिटल टीव्ही उत्तर प्रदेश
‘मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम’ अशी ही योजना असून या माध्यमातून विदेशी पर्यटकांना विदेशातून एका वर्षात ३० वेळा पैसे मागवता येतात. एका वेळी अधिकाधिक २५० अमेरिकी डॉलर म्हणजे २ लाख ७ सहस्र रुपये मागवण्याची या योजनेच्या अंतर्गत सुविधा आहे. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांना पैशाची लालूच दाखवून त्यांच्याकरवी विदेशातून पैसे पाठवले. भारतातील त्यांच्या आतंकवाद्यांना पर्यटकांच्या वतीने हे पैसे पुरवण्यात आले. या पद्धतीचा प्रयोग करून आतापर्यंत शस्त्र आणि स्फोटके खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये भारतात पाठवण्यात आले.
भारतीय अन्वेषण यंत्रणेने रिझर्व्ह बँकेचे साहाय्य घेऊन कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा अन् गोल्डी बराड यांच्याविरुद्ध ३२ ठिकाणी धाड घातली होती. यातून हा संपूर्ण प्रकार समोर आला.
Babbar Khalsa International sent crores of rupees to India through foreign tourists.
Instead of the traditional 'hawala,' they utilized the government facility of 'MTSS (Money Transfer Service Scheme).
Utilization of crores of rupees for the purchase of weapons and ammunition… pic.twitter.com/IO9dWIfjd3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 19, 2024
संपादकीय भूमिका
|