ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड !
रत्नागिरी – ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार साजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी धाड घातली. आतापर्यंत ६ वेळा त्यांची अलिबाग येथील कार्यालयात चौकशी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवी यांचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांचे हॉटेल यांचे मूल्यांकन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे बंधू, वहिनी, पुतणे यांची चौकशी करण्यात आली होती.
या संदर्भात राजन साळवी यांनी म्हटले आहे की, अधिकार्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. मला अटक झाली तरी चालेल. अटक, कारागृह हे काही मला नवीन नाही. मी काय आहे, ते माझे कुटुंब, जनता यांना ठाऊक आहे. भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. हे सर्व राजकीय दबावापोटी चालू आहे.