गोवा राज्यातील आमोणा आणि नावेली या गावांत सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांना मिळत असलेला चांगला प्रतिसाद !
‘गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील आमोणा आणि त्याच्या शेजारी असलेल्या नावेली या दोन्ही गावांत सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींना प्रतिदिन साधना, धर्मशिक्षण आणि हिंदु जागृती आदी सूत्रे अवगत होण्यासाठी मी त्यांना संपर्क करतो. त्यामुळे अनेक जण धर्मविषयक कार्यात सहभागी होत आहेत.साधकसंख्या अल्प आणि त्यांची क्षमता अल्प असूनही गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही गावांत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळीही चांगला प्रतिसाद मिळाला.
गुरुदेवांच्या कृपेने आम्हा सर्व साधकांना सेवा करतांना आनंद मिळतो. गुरुदेवांची कृपा सर्व साधक अनुभवत आहेत.’
– श्री. सुरेश सिनारी, आमोणा, डिचोली, गोवा. (१०.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |