प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती कृतज्ञताभाव असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. दीप पाटणे !
‘आम्ही (श्री. दीप पाटणे आणि मी) आध्यात्मिक मित्र आहोत. दीपदादाकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्याचे लक्षात आलेले गुण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी समर्पित करत आहे.
१. प्रेमभाव
मला बरे वाटत नसल्याने दीपदादा लगेच माझी विचारपूस करतो. तो मला ‘काही हवे का ?’, असेही विचारतो. माझ्या मनात एखादा विचार असेल किंवा मला काही सुचत नसेल, तेव्हा त्याला लगेच समजते. त्या वेळी मी त्याला काही सांगण्याआधीच तो माझ्याजवळ येऊन मला त्याविषयी विचारतो.
२. इतरांना साधनेत साहाय्य करणे
त्याला साधनेविषयी एखादे सूत्र शिकायला मिळाल्यास तो लगेच मला सांगतो आणि मला तसे प्रयत्न करायला प्रेरित करतो. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो.
३. सेवाभाव
त्याला कोणतीही सेवा सांगितली, तरीही तो ती सेवा करायला तत्पर असतो.
४. तत्त्वनिष्ठ
त्याने मला कधीच भावनिक स्तरावर हाताळले नाही. माझे काही चुकत असल्यास तो तत्त्वनिष्ठतेने माझ्या चुका सांगतो.
५. कर्तेपणा नसणे
त्याच्या गुणांचे कौतुक केल्यावर तो कर्तेपणा गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि म्हणतो, ‘‘गुरुच करून घेतात; म्हणून होते.’’
६. कृतज्ञताभाव
त्याचा ‘गुरुप्राप्ती करायची’, असा दृढ निश्चय आहे. ‘आतापर्यंत गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्यासाठी किती केले आहे !’, या विचाराने त्याला पुष्कळ कृतज्ञता वाटत असते.
दीपकडून मला पुष्कळ शिकायला मिळते. त्याच्यासारखा आध्यात्मिक मित्र लाभल्यामुळे मला सच्चिदानंद परब्रह्म गुरूंप्रती कृतज्ञता वाटते. ‘मला त्याच्यामधील गुण शिकण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. राजेश दोंतुल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२२)