सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांच्याकडून त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
१. पू. सत्यनारायण तिवारी यांच्याशी झालेला संवाद
‘ऑक्टोबर २०२३ मध्ये मी पू. बाबांना (सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी यांना) भेटायला संभाजीनगर येथे गेले होते. तेव्हा आमच्यात पुढील संवाद झाला.
पू. बाबा : आरती, मला अजून किती जगायचे आहे ?
मी : बाबा, तुम्ही तर संत आहात, तुम्हालाच ठाऊक ! नाहीतर तुम्हीच गुरुदेवांना विचारा !
पू. बाबा (एक क्षण थांबून) : गुरुदेव म्हणतात, ‘भोग भोगून संपवा, मग जाऊ.’
मी : मग ठीक आहे. तसे करूया. नाहीतरी तुम्ही संत आहात. तुमची इच्छा ! तुम्ही तुमच्या इच्छेने देह सोडणार, जन्म घेणार. तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे का ?
पू. बाबा : गुरुदेवांची इच्छा ! पण आता त्यांनी सांगितलेच, तर जन्म घेणार आणि केवळ साधनेसाठीच जन्माला येणार ! संसारासाठी, भोग भोगायला नाही.
२. वरील संवादातून शिकायला मिळालेली सूत्रे
त्यांचे बोलणे ऐकून माझे मन शांत झाले आणि मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
अ. संतांमध्ये साधनेची तळमळ पुष्कळ असते.
आ. ‘भोग भोगणे’, हीसुद्धा साधनाच आहे.
इ. माझी साधनेची तळमळ पुष्कळ वाढायला हवी.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. सत्यनारायण तिवारी यांची मुलगी), नागेशी, गोवा. (१७.११.२०२३)