Ram Mandir Live Broadcast : कोलकाता येथे श्रीराममंदिराच्या थेट प्रक्षेपणाला दिली अनुमती !
कोलकाता उच्च न्यायालयाकडून बंगाल पोलिसांना चपराक !
कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांनी २२ जानेवारीला अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यासाठी अनुमती नाकारली होती. याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांचा आदेश रहित करून थेट प्रक्षेपण दाखवण्याला अनुमती दिली आहे. ‘कालीघाट बहुमुखी सेवा समिती’कडून हे आयोजन करण्यता आले आहे. न्यायालयाने अनुमती देतांना हा कार्यक्रम दक्षिण कोलकाताच्या देशप्राण सशमल पार्कमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यास सांगितले आहे. यापूर्वी हा कार्यक्रम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरापासून काही अंतरावर होणार होता.
Calcutta HC overrules Kolkata Police orders
Allows Live Broadcast Of Ram Mandir Inauguration, in In South #Kolkata Park
कोलकाता I राम मंदिर प्राण प्रतिष्ठा #CalcuttaHighCourt #RamMandirPranPratishtha pic.twitter.com/HpoTJo4lTB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 18, 2024
संपादकीय भूमिकाबंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार श्रीरामद्वेषी आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. गेल्या वर्षी सरकारने श्रीरामनवमीच्या वेळी काढण्यात येणार्या मिरवणुकांनाही अनुमती नाकारली होती, हे लक्षात घ्या ! |