रामललाच्या आरतीला ‘ऑनलाईन’ उपस्थित रहाता येणार !
अयोध्येतील राममंदिरातील श्री रामललाच्या आरतीला उपस्थित रहाता यावे, यासाठी भाविकांच्या सेवेसाठी न्यासाच्या वतीने पाससाठी ‘ऑनलाईन’ अर्ज प्रक्रिया चालू केली आहे. राममंदिर न्यासाचे सदस्य प्रकाश गुप्ता यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, एकूण पासपैकी २० ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा ३० डिसेंबरपासून कार्यान्वित झाली आहे.
श्रीराममंदिराचे ‘ऑनलाईन पास’ अगोदर कसे नोंदवावेत आणि आरतीची वेळ जाणून घ्या !
- ‘ऑनलाईन पास’ आगाऊ नोंदवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी https://srjbtkshetra.org/ वर उपलब्ध असलेल्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या अधिकृत संकेतस्थळावर पास काढता येणार आहे.
- मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११.३० आणि दुपारी २ ते संध्याकाळी ७ पर्यंत असते.
- सकाळी ६.३० वाजता सकाळचे जागरण किंवा श्रृंगार आरती, दुपारी १२.३० वाजता भोग आरती करण्यात येते. संध्याकाळी ७.३० वाजता आरती असणार आहे.
- आरतीच्या पाससाठी आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना आणि पारपत्र ही ४ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कोणत्याही सुरक्षा प्रक्रियेसाठी या ४ कागदपत्रांपैकी १ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.