(म्हणे) ‘मशीद तोडून मंदिर बांधणे स्वीकारता येणार नाही !’ – उदयनिधी स्टॅलिन
तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे विधान !
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)
चेन्नई (तमिळनाडू) – द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) पक्ष कधीही धर्माच्या विरोधात नाही; मात्र मशीद पाडून मंदिर बांधणे, या गोष्टीचा स्वीकार करता येणार नाही, असे मत द्रमुकचे तमिळनाडूतील मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर मांडले. उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यू या रोगांशी केली होती. ‘सनातन धर्माला नष्ट केले पाहिजे’, अशा आशयाची विधाने त्यांच्या नेत्यांकडून केली जात आहेत.
सौजन्य इंडिया टूडे
संपादकीय भूमिका
|